पुणे
पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावीत अंतरराष्ट्रीय विमानतळ अजुन कागदावरच आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे अजुन तळ्यात मळ्यातच चालु आहे.त्यामुळे विमानतळाच्या प्रस्तावित ठिकाणाच्या परिसरात जमीनिंचे भाव वाढलेले आहेत.यातुनच निर्माण झालेल्या एका कौटुंबिक वादातुन एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे.
स्वाती जयजीत काकडे (वय३१) या विवाहितेने सासरच्यांकडुन होत असलेल्या छळाला कंटाळुन आत्महत्या केली आहे.”तुझ्या वडिलांना विमानतळाचे किती पैसे मिळणार आहेत”अस म्हणत तिच्या पतीकडुन सतत पैशांची मागणी केली जात होती,असे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
स्वाती काकडे यांचे सासर बारामती तालुक्यातील निंबुत येथील तर माहेर पुरंदर तालुक्यातील नायगाव हे आहे.पती जयजीत काकडे यांच्यासह सासरच्यांकडुन त्यांचा सतत छळ केला जात असल्याची फिर्याद स्वाती यांचे बंधु संतोष बाळासाहेब कड यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे.
त्यानुसार जयजीत काकडे,सासु मिनाक्षी अरुण काकडे व सासरे अरुण भगवान काकडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.शुक्रवारी रात्री माहेरी घराजवळील विहिरीत उडी मारुन स्वाती यांनी आत्महत्या केली.
“तुझे वजन जास्त आहे तु रोज एकच चपाती खा” असे म्हणत स्वाती यांना उपाशीही ठेवले जात होते.लग्नात माहेरकडुन कुलर,वॉशींग मशीन अशा मोठ्या वस्तु दिल्या नाहीत,वडिलांना विमानतळाचे पैसे मिळणार आहेत असे म्हणत सतत पैशांची मागणी केली.आम्ही काकडे देशमुख आहोत आमच्याशेजारी बसायची लायकी नाही,असा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला असे फिर्यादीत म्हटले आहे.
शुक्रवारी स्वाती या माहेरी असताना पतीने दिवसभर फोन करुन त्रास दिला.रात्री नऊ वाजताही पतीने फोनवरुन वाद घालत मानसिक छळ केला.त्याच रात्री स्वाती यांनी शेतातील विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली.असे फिर्यादित नमुद करण्यात आले आहे.याप्रकरणी रविवारी सायंकाळी संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.