विमानतळ विरोधी कृती समिती स्वयंघोषीत असती तर हजारोंचे मोर्चे निघाले नसते :जि.प.सदस्य दत्तात्रय झुरंगे

विमानतळ विरोधी कृती समिती स्वयंघोषीत असती तर हजारोंचे मोर्चे निघाले नसते :जि.प.सदस्य दत्तात्रय झुरंगे

पुरंदर

पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मा.राज्यमंत्री शिवतारे हे निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन लोकांची दिशाभुल करतात तसेच विमानतळ विरोधी संघर्ष समिती नसती तर हजारोंचे मोर्चे निघाले असते का?असा सवाल जि.प.चे सदस्य दत्तात्रय झुरंगे यांनी वनपुरी येथे झालेल्या विमानतळ निषेधाच्या सभेत विचारला.

स्वयंघोषीत समिती तसेच स्वयंघोषित पदाधिकारी या समितीत नाहीत ही समीती ही विमानतळ विरोधी असल्याने प्रत्येक शेतकर्याच्या हितासाठी व त्याचा हक्कासाठी ही समिती असल्याचे दत्तात्रय झुरंगे यांनी सांगीतले.

तुमची तालुक्याबद्दल असलेली विकासकामांची भुमिका पाहुन तालुक्याने तुम्हाला पाच वर्षासाठी घरी बसविल्याने आपण घरी बसुन पुरेपुर आराम करावा उगाचच लुडबुड करु नये असेही अप्रत्यक्षरीत्या शिवतारेंना समितीने टोला लगावला.

यावेळी विमानतळ विरोधी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य दत्ता शेठ झुरुंगे, कृती समितीचे प्रवक्ते जितेंद्र मेमाणे,कार्याध्यक्ष संतोष हगवणे,वनपुरी गावचे सरपंच नामदेव आप्पा कुंभारकर,उदाचीवाडी गावचे सरपंच संतोष कुंभारकर,पारगाव चे उपसरपंच महेश मेमाने, नाथाबापपू कुंभारकर ,शिवाजी भामे कैलास कुंभारकर, लक्ष्मण बोरावके, गणेश मेमाने ,आणि कुंभारवळण उद्याची वाडी वनपुरी खानवडी एखतपूर मुंजवडी आणि पारगाव विमानतळ बाधीत शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *