पुरंदर
पुरंदर हवेली चे माजी आमदार व राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी थेट अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पहाटेचा शपथविधी सत्य होता.अजित पवार थोतांड माणूस नाही.असेही विजय शिवतारे यांनी म्हटले.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना ही प्रांतीय पक्ष आहे. अशा गतिमान सरकार बरोबर जर अजित पवार आले. तर एक चांगल्या प्रकारचे वातावरण निश्चित तयार होईल. पण शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे असे विजय शिवतारे म्हणाले.
पण एक गोष्ट अशी आहे अजित दादा पवारांसारखा माणूस आला तर कोणाला आवडणार नाही. त्यांनी आमच्या शिंदे यांच्या शिवसेनेत यावं. असं विजय शिवतारे यांनी त्यांना खुल आमंत्रण दिलं आहे.
आता या निमंत्रणावर उद्या सासवड येथे होणा-या शेतकरी मेळाव्यात अजित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देणार? याकडे संपूर्ण पुरंदर – हवेलीचे लक्ष लागले आहे.