पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील विजपुरवठा सुरळीत व नियमित करण्यासाठी पुरंदर हवेलीचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कार्यकारी अभियंता,सासवड विभाग यांना लेखी निवेदन दिले आहे.
पुरंदर तालुक्यातील बरेच विद्यार्थी हे युपीएससीची तयारी करत असुन काही विद्यार्थ्यांनी विजय शिवतारे यांना संपर्क साधुन वीजपुरवठ्याबाबत तक्रार केली होती. सासवड शहरात मागील ३ आठवडे सासवड शहरात विजेचा पुर्ण बट्ट्याबोळ झाला असुन महावितरणकडुन त्यावर उपाययोजना का करण्यात आली नाही असाही प्रश्न निवेदनात विचारला आहे.
तसेच सातत्याने विजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असुन पाणीपुरवठा सुद्धा विस्कळीत झाला आहे.याबाबत संबंधीतांना सुचना देऊन ताबडतोब वीजपुरवठा नियमित आणि सुरळीत होईल याची दक्षता घ्या असे निवेदनात म्हटले आहे.