बारामती
प्रतिनिधि कल्पना जाधव
शिवसेना बारामती महिला आघाडीच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना सहकार्य करण्याकरिता उभारण्यात आलेल्या अभियानाचा शुभारंभ शिवसेनेच्या खडकवासला संघटक पुजाताई रावेतकर यांनी केला.
पुजाताई रावेतकर यांनी स्वत:च्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळुन कोकण पुरग्रस्तांसाठी २१००० रुपयांचा धनादेश बारामती लोकसभा संपर्क संघटिका शालिनिताई देशपांडे यांच्याकडे सुपुर्त केला.
वाढदिवस तर प्रत्येक वर्षी येईल परंतु वंदनीय हिदुह्रदयसम्राटांच्या शिकवणीप्रमाणे आधी समाजकारण या विचाराने तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन ही मदत करत असल्याचे पुजाताई रावेतकर यांनी सांगीतले.