वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जेजुरीची सोमवती यात्रा रद्द

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जेजुरीची सोमवती यात्रा रद्द

त्यादिवशी जेजुरीत लागु होणार जमावबंदी आदेश

पुरंदर

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जेजुरीची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे.या अनुषंगाने पोलीस स्टेशन मध्ये विश्वस्त पुजारी मानकरी गावकरी यांची बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये सोमवती अमावस्या चे नियोजन करण्यात आले सध्या कोरूना प्रादुर्भाव असल्याने व तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने व शासनाचे निर्बंध अजून कडक असल्याने सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आलेली आहे.

या काळामध्ये सर्व गावातील व्यवसायिक लॉज धारक हॉटेल मालक यांनी रविवार व सोमवार कोणत्याही प्रकारचे बाहेर गावातील व्यक्तींचे बुकिंग घेऊ नये संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना अपील करण्यात येत आहे की कुणीही सोमवती अमावस्या यात्रेसाठी जेजुरी मध्ये येऊ नये जेजुरी मध्ये त्यादिवशी जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार आहे सोमवती निमित्त निघणारी पालखी उत्सव रद्द करण्यात आलेला आहे.

त्यादिवशी जेजुरी मध्ये जाणारे सर्व रस्ते बॅरिकॅडींग लावून बंद करण्यात येणार आहे जेजुरीमध्ये कोणत्याही प्रकारचे वाहन पार्किंग तळ उपस्थित असणार नाही. मंदिर भाविकांसाठी दर्शनाला बंदच राहणार आहे तसेच त्यादिवशी कुणालाही जेजुरी मध्ये प्रवेश दिला जाणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *