वर्हाडी म्हणुन लग्नाला आला,जेवनावर चांगला ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला

वर्हाडी म्हणुन लग्नाला आला,जेवनावर चांगला ताव मारला आणि नववधूचे सहा लाखांचे दागिने उचलून पळाला

नाशिक

इगतपुरीतील केपटाऊन व्हिलाज् रिसॉर्ट नेहमीच वेगवेगळ्या घटनांमुळे वादाच्या भोवऱ्यात असते. नुकतेच एका व्यापाऱ्याच्या पुतणीच्या लग्न सोहळ्यात चोरीची घटना घडली.

नववधूची सहा लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. हा चोरटा लग्नातील फोटोमध्ये कैद झाला आहे.

केपटाऊन व्हिलाज हे रहिवासी संकुल आहे. या ठिकाणी रिसॉर्टची परवानगी नसतानाही पर्यटकांना भाडे तत्त्वावर लॉजिंग किंवा लग्न समारंभासाठी ऑनलाईन बुकिंग दिले जाते.

अशी स्थानिकांची ओरड आहे. असं असताना मंगळवारी घोटी येथील व्यापाऱ्याच्या पुतणीचा लग्न सोहळा या केपटाऊन व्हिलाजमध्ये सुरु होता.

यावेळी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास 6 लाख 11 हजार रुपये किमतीचे वधूचे सोन्याचे दागिने असलेली बॅग उचलून अज्ञात व्यक्तीने पलायन केले.

या घटनेबाबत नवऱ्या मुलीचे काका ताराचंद केवलचंद बबेरवाल (वय 45 वर्ष, रा. घोटी) यांनी चोरीच्या घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले की पुतणीचे लग्न सोहळा सुरु असताना एक अज्ञात व्यक्ती व्यासपीठावर तोंडाला मास्क लावून चोरीच्या तयारीने आला.

कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून दागिने असलेली बॅग घेऊन तो निघून गेला. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आणि लग्न समारंभातील फोटो शूटिंगमध्ये या इसमाच्या हालचाली कैद झाल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *