मुंबई : बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या अभिनयासाठी सर्वदुर प्रसिद्ध आहे. बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही त्यांनी आभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयाव्यतीरिक्त ते वैयक्तीक जीवनात परखड मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात.
सध्या अनुपम खेर हे शिमल्यात त्यांच्या घरी असून यावेळी त्यांनी तेथे संरक्षण देत असलेल्या जवानांसोबतही मजेशीर व्हिडीओ बनवले होते. यातील एका व्हिडीओत त्यांनी मास्क घालणार नाही असे म्हंटले आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर फार सक्रिय दिसतात. सध्या ते शिमल्यात असल्याने तेथील निसर्गाचा आनंद घेत आहेत. तेथील अनेक व्हिडीओ ते पोस्ट करताना दिसत आहेत. अभिनेते अनुपम खेर हे शिमल्यातील त्यांच्या घराबाहेर फिरत असताना त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता.तेव्हा त्यांनी व्हिडीओ पाहणाऱ्यांना उद्देशून म्हटलं की ‘पुन्हा म्हणू नका की मास्क लावला नाही.’ या व्हिडीओत ते एका जवानाशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक मास्क आहे. तेव्हा त्यांना आपण लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अनुपम यांच्या या व्हिडीओवर त्यांना अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. सोशल मीडियावर काहींनी त्यांना म्हटलं आहे की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो. अनुपम यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. https://www.instagram.com/tv/CQgtHMYFIxN/?utm_source=ig_web_copy_link