पुणे
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ने नेते रोहित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाद पाहायला मिळत आहे. काही दिवसांपुर्वीच आमदार रोहित पवार यांनी “गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय असून ते प्रसिद्धीसाठी पवारांवर टीका करतात, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असे विधान केले होते.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार हा बिनडोक माणूस असल्याची जहरी टीका केली आहे.
चिंचवड मतदार संघामध्ये अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.रोहित पवार हे बिनडोक आहेत. त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बोटे घालण्याची सवय आहे. असा टोला त्यांनी रोहित यांना लगावला आहे. MPSC तरुणांच्या आंदोलनाचे शरद पवार यांना श्रेय घ्यायचे म्हणून ते बैठक घडवून आणत आहेत.
प्रत्यक्षात त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडवत आहेत,” अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला..तसेच यावेळी पुढे बोलताना त्यांनी “रोहित पवार मेंढराच्या डागनीने डागल तर ते सुधारणार नाहीत. खुरप्याने डागावे लागेल. मग कुठेतरी अक्कल येईल,” अशी टीकाही रोहित पवार यांच्यावर केली..
दरम्यान, पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे प्रचाराच्या तोफा जोरदार दणाणत आहेत. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील दिग्गज नेतेमंडळी सध्या पुण्यात तळ ठोकून आहेत