मुंबई
राज्यातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर कोरोनाची लस घ्यावी, कोरोनाची स्थिती पूर्ण नियंत्रणात यावी यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या नियमावलीची घोषणा केली आहे.
अनेकजण रुमालाचा वापर मास्क म्हणून करतात. याला आता चाप बसणार असून रुमालाला मास्क समजण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मास्कच्या ठिकाणी रुमालाचा वापर केल्यास 500 रुपये दंड लावण्याची घोषणा करण्यात येणार आहे.
तर खाजगी वाहक कंपनी मालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.