राष्ट्रवादीच्या “या” युवती प्रमुखाने चोरल्या तब्बल अकरा गाड्या

राष्ट्रवादीच्या “या” युवती प्रमुखाने चोरल्या तब्बल अकरा गाड्या

चंद्रपुर

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस प्रमुख कार्यकर्तीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या तरुण कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदारांना मोपेड चारीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.वैष्णवी देवतळे असे अटक करण्यात आलेल्या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे.

आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ती बाईक चोरी करत असल्याचे उघड़ झाले आहे.तिचे दोन साथीदार विशिष्ठ पद्धत वापरुन लॉक नसलेल्या मोपेड चोरुन त्या विकण्याचा धंदा ही टोळी करत होती.

गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे.नेमकी संधी साधुन मोपेड चोरी करत असे.त्या गाडीला दुरपर्यंत ढकलुन नेण्यात येत होते.या टोळीकडुन अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी वैष्णवीसह मनिष पाल,सौरभ चंदनखेडे अशा तिनही आरोपींना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *