राष्ट्रवादीच्या “या” तालुकाध्यक्षाची महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण

राष्ट्रवादीच्या “या” तालुकाध्यक्षाची महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण

बुलडाणा

बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाईगिरी पाहायला मिळत आहे. आधीचा तालुका अध्यक्ष मर्डर केसमध्ये तुरुंगात असताना, नव्या तालुका अध्यक्षांनी महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बुलडाण्यातील स्थानिक राजकारणात चाललंय तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आधीचे खामगाव तालुकाध्यक्ष भरत लाहुडकार एका हत्या प्रकरणात जेलमध्ये आहेत.

तर खामगाव राष्ट्रवादीचे नवीन तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांचीसुद्धा भाईगिरी आता समोर आली आहे. हिंगणेंनी एका महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

खामगाव राष्ट्रवादीचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांनी बुलडाण्यातील आमसरी गट ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याला काही जणांच्या साथीने मारहाण केल्याचा आरोप आहे.

या महिलेने पोलिसात तक्रार दिली असून अंबादास हिंगणे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुणाचे अभय मिळत आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याआधीचे खामगाव तालुका अध्यक्ष भरत लाहुडकार एका मर्डर केसमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

तर नवीन तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांनीही अशा पद्धतीने भाईगिरी केल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे. नव्या तालुका अध्यक्षांच्या विरोधात जलंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून त्यांना पकडण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *