रामोशी समाजाला न्याय मिळवुन देणार-माजी मंत्री विजय शिवतारे

रामोशी समाजाला न्याय मिळवुन देणार-माजी मंत्री विजय शिवतारे

रामोशी समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा,शिवसेना,भाजप रिपब्लिकन पक्षांसह विविध सामाजिक संघटनेने दिला पाठिंबा

सासवड

 सासवड येथील रामोशी वतनाची शेतजमीन , सर्वे नं. ६१९ / २ / १ ही जमिन क्षेत्र ५ एकर ७आर, सन १९८३ साली सासवड नगरपालीकेने जिजामाता उद्यान या करीता आरक्षित करुन सदर ठिकाणी जिजामाताउद्यान उभारले आहे, तसेच पालखी मैदानाला लागुन सदर भांडवलकर कुटुंबाचे असलेले १६ आर क्षेत्र ही सासवडनगरपालीकेने सदर कुटुंबाला विश्वासात न घेता बळकावले आहे असे या कुटुंबाचे म्हणने आहे व या दोन्ही शेतजमिनीचासदर भांडवलकर कुटुंबाला मोबदला मिळाला नाही त्यामुळे सदर कुटूंबानी सदर जमिन परत मिळावी या मागणीसाठी सासवड नगरपालीके समोर  गुरुवार दि. १ जूलै पासुन बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे.

सदर आंदोलनाला काल पाचव्या दिवशी सासवड शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला यावेळी लाईवफेसबुक द्वारे  माजीमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई येथुन भांडवलकर कुटुंबाला पाठींबा देताना  रामोशी समाजाच्यान्याय हक्कासाठी वेळप्रसंगी लढा उभारुन सदर कुटुंबाला मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी बोलतानाशिवतारे म्हणाले की नगरपालिकेने किंवा शासनाने भांडवलकर कुटुंबाच्या जमिनीवर आरक्षण टाकुन त्या जागेवर उद्यानउभारले आहे सदर जागेचा मोबदला पिडीत कुंटूबाला मिळणे आवश्यक आहे सदर मोबदला संबंधित कुटुंबाला अथवात्यांच्या वारसाला मिळाला नसेल तर , सदर कुटुंबाला मोबदला मिळवून देण्यासाठी मी व शिवसेना शेवट पर्यंतभांडवलकर कुटुंबा सोबत राहु , वेळ प्रसंगी रामोशी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारेल असे मत ही विजयशिवतारे यांनी व्यक्त केले, तब्येत ठीक नसल्याने मला पुरंदरला येता आले नाही त्यामुळे व्हिडिओ द्वारे सदर पाठींबा देतआहे आपण सर्व महसूल दस्तऐवज फेरफार काढा याबाबत मा. प्रांत साहेब व मा . तहसिलदार साहेब यांना ही आपणाससहकार्य करण्या बाबत सुचना केल्या जातील ,असे ही शिवतारे म्हणाले.

सदर आंदोलनाला ,भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यातआला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाने सदर आंदोलनाकडे काल पर्यंत पाठ फिरवलेली दिसुन येत आहे.याबाबतसंबंधित कुटुंबाशी चर्चा केली असता जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन केले जाईल अशीप्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी दिली आहे,

भांडवलकर कुटुंबाच्या वतीने तुकाराम भांडवलकर, गोपाळ भांडवलकर, बबन भांडवलकर, रामदास भांडवलकर, खोमदासभांडवलकर, राजेंद्र भांडवलकर, हरीचंद्र भांडवलकर, विशाल भांडवलकर, वसंत भांडवलकर, आप्पा भांडवलकर, इत्यादींनी सदर चक्री उपोषणात सक्रीय सहभाग घेतला आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *