पुरंदर
सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड येथे शिवातीर्थ चौकात क्रांतिसुर्य महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाट्न जेष्ठ इतिहासकार डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी दीप प्रजवलन करून केले.
यावेळी आर पी आय चे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी प्रास्ताविक करतेवेळी असे म्हंटले की देशात मोठ्या प्रमाणात अराजकता माजलेली आहे,जातीय ध्रुवीकरण वाढीस लागलेलं आहे.बाहेरून येऊन काही कट्टरतावादी संघटना आमच्या तालुक्यात जातीय विष पेरण्याचे काम करित आहेत.मागे 2000साली काही सनातनी प्रवृत्तीचे लोक हिंदू मुस्लिम दंगल घडविण्यात यशस्वी ठरले होते.त्याची पुणेरावृत्ती होण्यासाठी काही विघ्नसंतोषी व्यक्ती तालुक्यातील युवा वर्गाला हाताशी धरून त्यांची माथी भडकवण्याचे काम करित आहे.त्यांना वेळीच ठेचन गरजेचं आहे.
यावेळी प्रमुख व्याख्याते डॉ.श्रीमंत कोकाटे असे देखील म्हंटले की प्रत्येकाने भारतीय संविधान अभ्यासने गरजेचे आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यात प्रत्येकाला वागणे,बोलणे ,खाने,धार्मिक स्वातंत्र्य होते तेच तत्व भारतीय संविधानात अंगिकृत केलेले आहे. बाबासाहेबांनी पहिला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळी त्यांची घोषणा “जय शिवाजी जय भवानी “होती.परस्त्री कडे वाकड्या नजरेने पाहायचे नाही असा स्वराज्याचा दंडकं होता तिच आणी भारतीय राज्य घटनेत देखील महिलांच्या संरक्षणाबाबत विशिष्ट कायदे केलेले आहेत.
या कार्यक्रमावेळी समाजात काही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे दै.प्रभात चे पत्रकार अमोल बनकर,उद्योग क्षेत्रात यशस्वी पणे वाटचाल करणारे सवाई उदयोग समूहाचे सर्वेसर्वा अजित गोळे व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे जातीय सलोखा सांभाळण्यास प्रयत्नशील असणारे मुबारकभाई शेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या पुरस्काराला उत्तर देताना मुबारकभाई शेख असे म्हंटले की डॉ. आंबेडकरांच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार म्हणजे मी कृत् कृत्य झालो.यावेळी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.द्वित्तीय सत्रात भीमा तुझ्या जन्मामुळे हे महानात्य प्रा.प्रकाश वाघमारे लिखित सादर करण्यात आले.
जेजुरी नगरीचे मा.नगरसेवक मेहबूबभाई पानसरे ,प्रा.केशव काकडे ,राहुल गिरामे,महेश जगताप,महेंद्र घोडके,दादा गायकवाड, भगवान दिखले उपस्थित होते.सूत्रसंचालन स्वप्नील कांबळे यांनी केले,तर आभार प्रियंका गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमाचे संयोजन रवी वाघमारे,युवराज धिवार,प्रस्मित धिवार ,अजय धिवार ,स्वप्नील घोडके यांनी केले होते.