पुरंदर
बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सासवड येथे नागेश्वर मंदिर आणि संत सोपान काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्याच बरोबर त्यांनी मंदिराची माहिती घेतली. यानंतर पुरंदरचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केलीय.. सुळे यांनी अगोदर मटन खाल्लं आणि नंतर देवदर्शन घेतलं असं म्हणत त्यांनी फेसबुक वर सुळे यांचा एका हॉटेलमधील मटणाच्या थाळी बद्दल बोलत असतानाचा व्हिडिओ आणि फोटो त्यांनी फेसबुक वर शेअर केलेत..
शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील देवदर्शनाचे चार फोटो शेअर केले आहेत. तसेच हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्यावर कमेंट केली आहे. ” आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला ||, अशी खोचक टीका शिवतारे यांनी केलीय.
देव दर्शनासाठी भाव महत्त्वाचे असतात.काय खाल्ले हे महत्वाचे नाही .पांडुरंग तर वारीत बोंबील खणाराला ही पावल्याचे उदाहरण असल्याचे हरिभक्त परायण सुनील महाराज साळवे यांनी संजीवनी न्युजशी बोलताना म्हटलंय त्यामुळे काय खाऊन देशन घेतले हे फारसे महत्त्वाचे नसल्याचे लोकांकडून बोलला जातंय.तर संतांनी अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलंय.. सुळे या सुद्धा अंधश्रद्धाळू नसल्याचं त्यांनी म्हटलंय.