सोलापुर
ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त घाटणे गावात “श्री.भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धा २०२३” चे आयोजन करण्यात आले होते. दि.१४ एप्रिल रोजी या भव्य कुस्ती स्पर्धा पार पडल्या.
या कुस्ती स्पर्धेचे विशेष हे की, कुस्तीवर अन् लाल मातीवर प्रेम करणाऱ्या घाटणे ग्रामस्थांसाठी तब्बल ३५ वर्षांनंतर कुस्तीचा आखाडा युवा सरपंच ऋतुराज देशमुख,यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने रंगला.
कुस्ती मैदानाचे पूजन पूजनीय राजेंद्र खर्गे महाराज व प्राध्यापक बाजीदेव यांच्या शुभहस्ते पार पडले. या कुस्ती मैदानासाठी पंचक्रोशीतील शेकडो कुस्तीप्रेमी, मोहोळ तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.