अहमदनगर
नगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखानाची सत्ता भाजप नेते मधूकर पिचड यांच्या व त्यांच्या गटाच्या हातून गेली आहे. या निवडणुकीत मविआच्या गटाने बाजी मारली आहे.
अगस्ती कारखाना निवडणूकीसाठी नुकतेच मतदान झालं होते. त्याचीमतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत गेली 28 वर्षांपासून असलेली सत्ता भाजप नेते मधूकर पिचडांनी गमावली आहे.
आमदारकी, ग्रामपंचायत आणि आता कारखाना निवडणूकीत मधुकर पिचड यांच्या गटास पराभवाच्या छायेत जावं लागलं आहे.या निवडणुकीत पिचड गटाच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर मविआच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा जयघोष केला.