कोल्हापुर
माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ माणगाव ग्रामपंचायत 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील एका विधवा महिलेला एक दिवसाकरिता प्रतीकात्मक सरपंच करून त्यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
माणगाव ग्रामपंचायत तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी जो विधवा अनिष्ट प्रथा बंदी चा जो ठराव केला आहे त्या ठरावाच्या अनुषंगाने ही प्रथा कायमस्वरूपी नष्ट व्हावी म्हणून माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी गावातील विधवा महिलांच्या यादीप्रमाणे चिठ्ठ्या तयार करून त्यातून एक चिठ्ठी काढणार व ज्यांच्या नावाची चिठ्ठी निघेल त्या महिलेस जिल्हा परिषदेच्या पूर्वपरवानगीने एक दिवसाचा सरपंच करून त्यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी गावचे ध्वजारोहण त्या महिलेच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच गावातील कुमार विद्यामंदिर ,कन्या विद्या मंदिर, व चावडी कार्यालय ,या तीन ठिकाणी फोटो पूजन व श्रीफळ वाढविणे तसेच झेंडावंदन करणे याही ठिकाणी गावातील विधवा महिलांना स्थान देऊन त्यांच्या हस्ते सर्व कार्यक्रम करण्यात येणार आहेत, गाव सभेमध्ये विधवा प्रथा बंदीचा ठराव केल्यानंतर ग्रामस्थांच्या मध्ये परिवर्तन होत आहे, त्या अनुषंगाने माणगाव ग्रामपंचायत ने हा निर्णय घेतला असून यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदे सोबत पत्र व्यवहार ही केला आहे.
लवकरच याबाबतीत जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे कडून आम्हास एक दिवसाचा प्रतीकात्मक सरपंच करण्यासाठी मान्यता मिळेल समाजामध्ये व गावामध्ये विधवा महिलांना मानसन्मान मिळावा या हेतूने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या माणगाव मध्ये वेगवेगळे व नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले जात आहेत, आपल्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील ज्या कुटुंबानी विधवा प्रथा बंदी ठरावाच्या अनुषंगाने सकारात्मक पावले उचलले आहेत अशा कुटुंबाचा स्वातंत्र्यदिना दिवशी गावच्या वतीने मानसन्मान करण्यात येणार आहे.