औरंगाबाद
महिलांना राजकिय क्षेत्रात ५० टक्के आरक्षण असुन महिलांना गावचा कारभार हाताळता यावा म्हणुन महिलांना गावच्या सरपंचपदावर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.
परंतु या पदाला अपवाद ठरले आहे सिल्लोड तालुक्यातील लिहा खेडी गाव. या गावात नुकताच धक्कादायक प्रकार घडला आहे.या गावातील महिला सरपंचाचा नवराच शासकिय कागदपत्रांवर सह्या करत असल्याच निदर्शनात आले आहे.
कायद्याच उल्लंघन करत सरपंचाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.ग्रामसेवकांदेखतच सरपंच महिलेच्या नवर्यान सही मारली आहे.बाजीराव माणिकराव दापके अस सरपंच पतीचे नाव आहे.