मोठेमोठे विकास हे तुमचे तुम्हाला लखलाभ : पुरंदरच्या “या” सातही गावातील सरपंच व शेतकऱ्यांच्या वतीने शिवतारेंच्या वक्तव्याचा निषेध

मोठेमोठे विकास हे तुमचे तुम्हाला लखलाभ : पुरंदरच्या “या” सातही गावातील सरपंच व शेतकऱ्यांच्या वतीने शिवतारेंच्या वक्तव्याचा निषेध

सरपंच व शेतकऱ्यांचे वतीने प्रसिध्दीस निवेदन

पुरंदर

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नुकतेच केलेले विधान हे खोटे आहे. आमदार संजय जगताप यांची विमानतळ बाबत विरोधी भूमिका आहे. ते आमच्या मागे ठामपणे उभे आहेत. तसेच आम्ही सातही गावातील सरपंच आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. विमानतळास शेतकर्‍यांचा प्रचंड विरोध आहे.

विजय शिवतारे हे आम्ही तुम्हाला किती वेळा सांगायचे. वेड्यांचे सोंग घेऊन पेडगावला निघाले तुम्ही. विमानतळा बाबत आम्ही आंदोलने मोर्चे उपोषणे केली. हे सर्व तुम्हाला ज्ञात आहे. तरी तुमची येथेच विमानतळ करण्याची खुमखुमी जात नाही.

या अगोदर पारगाव येथे झालेल्या सभेत शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष रोष तुम्ही पाहिला आहेत.
आमदार संजय जगताप यांनी लोकांची होणारी ससेहोलपट जाणून घेतली आणि लोकांना सहकार्य केले. त्यांची चूक नसून त्यांचा द्रष्टेपणा आहे.

मोठेमोठे विकास हे तुमचे तुम्हाला लखलाभ. आम्हाला ही ते नको आहेत. तुम्हीला शेतकऱ्यांना सरळ सरळ दोष देता येत नाही म्हणून दुसऱ्या वर खापर फोडता. हा तुमचा बालिशपणा आहे.
आमच्या सातही गावांचा तुमच्या विमानतळास विरोध होता. आजही आहे आणि पुढेही राहणार हे निक्षून सांगत आहोत. ज्या तुमच्या कार्यकर्त्यांना विमानतळ पाहिजे असेल त्यांची नावे कृपया तुम्ही जाहीर करावीत. आणि पुन्हा पुन्हा बरळणे बंद करावे.

आम्ही आपल्या जमिनी देणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे.हे ध्यानात ठेवा असे पारगावचे सरपंच प्रियंका मेमाणे,खानवडी सरपंच स्वप्नाली होले,वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर, कुंभारवळणाच्या सरपंच अश्विनी खळदकर, उदाचीवाडीचे सरपंच संतोष कुंभारकर यांनी असे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

Comments

  1. आमदारांना शेतकऱयांची एवढी ससेहोलपट समजते तर मग विमातळाची जागा बदलून पुरंदर तालुक्यातच का दाखवली पारगाव एकटे तालुक्यात येते का आमदारांच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *