मोठी बातमी !!!!लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत २१०० रुपये;जाणून घ्या का?

मोठी बातमी !!!!लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत २१०० रुपये;जाणून घ्या का?

पुणे

सरकारची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते.

मात्र, काही महिलांना पुढच्या हप्त्यापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही.१५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. आता अर्जांची छाननी सुरू असून, ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असतील त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत.

खालील महिलांना मिळणार नाही हप्ता
वार्षिक उत्पन्न ₹२,५०,००० पेक्षा जास्त असल्यास.
कुटुंबातील कोणी व्यक्ती आयकर भरत असल्यास.
सरकारी नोकरीत कार्यरत किंवा पेन्शनधारक असल्यास.
कुटुंबात खासदार/आमदार असल्यास.

पुढील हप्ता कधी मिळणार?
डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता पात्र महिलांना लवकरच मिळेल.

योजना लाभ कसा मिळवालं?
अटींचे पालन करा.
अर्ज व्यवस्थित सादर करा.
त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मदत केंद्राशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *