पुणे
पुरंदर तालुक्यातील पवारवाडी फाटा येथे कंटेनर व मोटरसायकलच्या अपघातात महिलेचा मृत्यु झाला आहे.त्याबाबतची तक्रार अनिल दिलीप पवार,वय 28 वर्षे,व्यवसाय मजुरी रा.वाल्हा भैरवनाथ मंदीर जवळ ता पुरंदर जि पुणे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 07/12/2024 रोजी सायंकाळी 06/00 वाजता जेजुरी निरा रोड पवारवाडी फाटा दौंडज ता पुरंदर जि पुणे येथे माझे वडील दिलीप गजानन पवार आई छाया दिलीप पवार हे आमची बजाज कंपनीची गाडी नंबर एम एच 12 एफ एक्स 5700 ही घेवुन घरी वाल्हा ता पुरंदर जि पुणे येथे येत असताना कंटेनर गाडी नंबर एम एच 12 डब्लु एक्स 1739 रमेषसिंह सितारामसिंह सध्या रा टी एन टी कंपनी दौंडज ता पुरंदर जि पुणे मुळ रा आत्मज सितारामसिंह वार्ड नं 4 ग्राम जगदिषपुर पाठक बारौली भोजपुर पिरो बिहार 802207याने आपले ताब्यातील कंटेनर भरधाव वेगाने हयगयीने अविचाराने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालवुन माझे वडील चालवित असलेली बजाज कंपनीची मोटारसायकल नंबर एम एच 12 एफ एक्स 5700 हीस पाठीमागुन जोरात धडक मारुन माझे वडील दिलीप गजानन पवार यांचे गंभीर जखमेस व त्यांचे पाठीमागे बसलेली माझी आई छाया दिलीप पवार हीचे मृत्युस कारणीभुत होवुन आमचे गाडीचे नुकसानीस कारणी भुत झाला आहे.
म्हणुन सदर चालक रमेश सिताराम सिंह सध्या रा टी एन टी कंपनी दौंडज ता पुरंदर जि पुणे मुळ रा आत्मज सितारामसिंह वार्ड नं 4 ग्राम जगदिशपुर पाठक बारौली भोजपुर पिरो बिहार 802207 यांचे विरुदध कायदेषिर फिर्याद आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोसई पवार करीत आहेत.