पुरंदर
कानिफनाथ देवस्थान बोपगांव, ढवळेश्वर मंदिर आंबळे यांच्या नंतर संपूर्ण जिल्ह्यातील श्रद्धा स्थान असलेले पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असणारे प्राचीन शिवकालीन भुलेश्वर मंदिर या मंदिराकडे जाण्यासाठी ३०० मीटर रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात आहे.
वर्षाणुवर्षे हा रस्ता वनविभागाकडून ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा त्या मुळे रस्ता विकासाला वेग येईल व सुविधा देता येतील या साठी स्थानिक पंचक्रोशीतील नागरिक या संधर्भात पाठपुरावा करत होते .
मात्र,गेल्या दोन महिन्यां पूर्वी भुलेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मा अरुण यादव व ग्रामपंचायत माळशिरस यांनी या संधर्भात मा सनदी अधिकारी संभाजी झेंडे साहेब यांच्याकडे पत्र व्यव्हार करत मागणी केली.
संपूर्ण राज्याला परिचित असणारे आणि आपल्या प्रशासकीय कामाने पुरंदरचे नाव उंचीवर नेणारे संभाजी झेंडे यांनी सदर मागणीची दखल घेतली व अवघ्या २ महीन्यात भुलेश्र्वर रस्ता वनविभागाकडून ग्रामपंचायतीकडे वर्ग करून दिला .
आदरणीय झेंडे साहेबांनी नुकतेच बोपगाव ,आंबळे या ठिकाणी असणाऱ्या देवस्थान चे वनविभागाकडून जाणारे रस्ते सोडवले आहेत त्या मध्ये नविन भुलेश्वर मंदिराचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल आदरणीय संभाजी झेंडे साहेब यांचे सर्व स्थरावरून आभार मानण्यात येत आहेत.