पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील राजकीयदृष्ट्या सर्वात मोठी असणार्या माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्यानिवडणुकीत गोकुळ बबन यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माळशिरसचे उपसरपंच नंदा गायकवाड यांचा एक वर्षाचा कार्येकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हीनिवडणुक घेण्यात आली. सकाळी आकरा वाजता गोकुळ यादव यांनी आपला उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. बारा वाजेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनीउपसरपंचपदी गोकुळ यादव यांची बिनविरोध निवड केली. सचिव म्हणुन माळशिरसचे ग्रामसेवक सोनाली पवार यांनीकाम पाहीले.

यावेळी सरपंच महादेव बोरावके,उपसरपंच गोकुळ यादव, माजी उपसरपंच नंदा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य मोहनयादव,माऊली यादव ,राजेंद्र गद्रे,दत्तात्रय डोंबाळे ,अनिसा शेख ,राणी यादव,सारिका यादव,पुष्पा ताम्हाणे,रुपाली गुरवपरिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
