पुणे
लोकशाही मध्ये शिक्षित समाज निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षित समाजच मानवी हक्कांचे संरक्षण करण्याकरिता लढा उभारू शकतो. असे मत राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केले.
मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा मानवाधिकार पुरस्कार राजेंद्र बरकडे यांना देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यवस्थापक समिती सदस्य सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, डॉ.सुधाकर जाधवर हे होते, वक्ते ,लेखक नामदेवराव जाधव, बाल हक्क कार्यकर्त्या डॉ. यामिनी अडबे, गायत्री सिंग, शशीकांत बोराटे, सचिन झालटे, शार्दूल जाधवर, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर उपस्थित होते.
समाजातील वंचित, बहुजनांची मुले शिक्षण प्रवाहात यावी या करिता पुरंदर, फलटण, बारामती तालुक्यातील मुलांना स्कूल किट, मॉडर्न टीचर प्लेअर देऊन शिक्षण प्रवाहात राहतील या करिता प्रयत्न करून सामाजिक प्रबोधन करणे,
‘वाघर’ चित्रपटा द्वारे बालविवाह सारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट निर्माण करून सामाजिक जनजागृती करण्याचे काम केले. मुलं, अनाथ,वयोवृद्ध, माजीसैनिक, कोरोना काळातील सामाजिक मदत या लोकोपयोगी सामाजिक कामा बद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पुणे याठिकाणी करण्यात आला.
यावेळी धनगर उन्नती समाज मंडळाचे सचिव माणिकराव चोरमले, सामाजिक कार्यकर्ते संजय चोरमले, नवनाथ चोरमले, प्रदीप बरकडे, सतीश काळे, ईश्वर बरकडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता बरकडे, सविता बरकडे उपस्थित होते