माझ्या उधारीसाठी तुम्हीच दिवाणजी व्हा,पुणे जिल्ह्यातील “या” आमदारास पराभवानंतर दिली नोकरीची ऑफर

माझ्या उधारीसाठी तुम्हीच दिवाणजी व्हा,पुणे जिल्ह्यातील “या” आमदारास पराभवानंतर दिली नोकरीची ऑफर

पुणे

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव केला. जवळपास १ लाख ५० हजार १५२ मतांनी बाबाजी काळे विजयी झाले.विजयानंतर बाबाजी काळे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीका करत त्यांना नोकरीची ऑफर दिली आहे.

‘माझ्या उधारीसाठी तुम्हीच दिवाणजी व्हा…’, असे वक्तव्य बाबाजी काळे यांनी केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खेड आळंदी विधानसभा मतदारसघांचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळेंनी पराभूत उमेदवार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर निशाना साधला.

‘निवडणूक काळात माझी उधारी, व्यवसायाची ठेकेदारी काढली कसला वारकरी म्हणून हिनवलंही पण आता दिलीप मोहिते- पाटील यांनी माझ्या उधारीची यादी आणावी. तुम्हीच दिवानजी व्हा सर्वांची उधारी देऊ.’ अशा शब्दात बाबाजी काळेंनी मोहिते-पाटील यांच्यावर दिवाणजीच्या नोकरीची ऑफर दिलीय.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीदरम्यान बाबाजी काळे आणि दिलीप मोहिते पाटील याांनी जोरदार प्रचार केला.

या प्रचारादरम्यान दोन्ही बाजुंनी आरोपांच्या फेरी रंगल्या होत्या. आता ‘सामान्य लोकांनी गुंडगिरी दहशतीला बाजुला करुन वारकऱ्याला विधानसभेचा मानकरी केलाय.’, असं म्हणत बाबाजी काळेंनी मतदारांचे आभार मानले.दरम्यान, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते पाटील, शिवसेना ठाकरे गटाकून बाबाजी काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

त्याचसोबत, वंचित बहुजन आघाडीकडून रविंद्र रनधावे आणि आणखी एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवली होती. या मतदारसंघामध्ये १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीचा सामना रंगला होता. पण बालाजी काळे यांनी दणदणीत विजय मिळवला. सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *