पुरंदर
पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटिल ,यांच्या हस्ते मांडकी येथील भीमनगर कमान ते गणपती मंदिर रस्ता या कामाचा भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला.
सोमवारी ग्रामपंचायत सदस्य यांनी विकास कामा संदर्भात आमदार संजयजी जगताप यांची भेट घेतली होती या वेळी आमदार साहेबांनी त्वरित संबंधित ठेकेदारांना सूचना देऊन काम पूर्ण करण्यास सांगितले व गुरुवारी उद्घाटन करून कामाला सुरुवात करण्यात आली.
या वेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती नंदुकाका जगताप , सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोहन जगताप, पुरंदर तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष तेजपाल सणस ,काँग्रेसचे युवा नेते राहुल काका जगताप ,अँड विजय भालेराव, मांडकी गावचे सरपंच प्रियांका शिंदे, उपसरपंच विश्वास जगताप , पोलीस पाटिल प्रविण जगताप ,ग्रामपंचायत सदस्य मोहन जगताप , गजानन शिंदे , अतुल जगताप , बाळासो जगताप ,बाबा शिंदे ,अँड राहुल शिंदे ,सिमा भंडलकर , मनीषा जगताप , हनुमंत जगताप ,चंद्रकांत भोसले ,या वेळी उपस्थित होते.