पुरंदर
तालुक्यातील राजेवाडी विभागाअंतर्गत येणाऱ्या गावातील ट्रांसफार्मर ची संपूर्णपणे दुर्दैवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तरी याबाबत अधिकारी मात्र गांभीर्याने घेत नसल्याने डिपेंडला व्यवस्थित फ्युज व तारा नसल्याने आठवड्याला डिपी जळत असल्याने शेतकऱ्यांची पिके जळून जाण्याचे परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांनी आता महावितरणच्या दारात आंदोलन करण्याचा पवित्र देखील उचलल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
राजुरी गावठाण ट्रांसफार्मर वरून फक्त घरातील लाईट चालू आहे. तर शेती पंप गेल्या 2 महिन्यापासून बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पिके धोक्यात आली आहेत तर अनेक वेळा ट्रान्सफॉर्मर ची दुरुस्ती करून देखील सदरचा ट्रान्सफॉर्मर टिकत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी सांगितले तर या ट्रांसफार्मर वरील केबल ह्या अतिशय जीर्ण झालेले असल्याने हा ट्रान्सफॉर्मर सातत्याने जळत असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले.
सदरचा ट्रान्सफॉर्मर हा जळालेला असून वरिष्ठांना या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे व नजीकच्या काळात ट्रांसफार्मर बसवला जाईल असे राजेवाडी शाखा अभियंता ए.जी. जाधव यांनी सांगितले.
तर माळशिरस येथील अनेक विद्युत रोहित्रावर आकड्यांची संख्या वाढत असल्याने ट्रांसफार्मर जळत आहेत. यामुळे विद्युत कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र याकडे धारकांच्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले.