गुरुपौर्णिमे निम्मीत एस.एम.देशमुखांच्यावर पुष्पवृष्टी
पुरंदर :
पत्रकारीतेत युट्युब व वेब पोर्टेला वेगळे महत्व आले आहे. या सोशल मिडीयात काम करणाऱ्या युवा पत्रकारांना संघटनेत सामावून घेण्यासाठी राज्यभरात सोशल मिडीयाचे संघटन करण्यात येत आहे. सोशल मिडीयातील या युवकांचे तालुकास्तरीय संघटन मराठी पत्रकार परिषदेने आज पुरंदरमध्ये केले. महाराष्ट्र सोशल मिडिया परिषदे पुरंदर शाखेच्या अध्यक्षपदी विनय गुरव, उपाध्यक्षपदी आसिफ मुजावर, सचिवपदी स्वप्निल कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. मराठी परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
जेजुरी (ता.पुरंदर) येथील शरदचंद्रजी पवार जेष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका पत्रकार संघ आयोजित महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद पुरंदर शाखेची स्थापना शुक्रवार दि.२३ रोजी करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या सुचनेनुसार, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी सोशल मिडिया परिषद शाखा पुरंदरची कार्यकरणी जाहिर केली. अध्यक्षपदी भुलेशवरचे विनय विश्वास गुरव, उपाध्यक्षपदी जेजुरीचे आसिफ इब्राहिम मुजावर, सचिवपदी नीरेचे स्वप्निल बापुसाहेब कांबळे, कोषाध्यक्ष पदी वाल्हेच्या सौ.रोहिणी प्रकाश पवार, सहसचिवपदी शिवरीचे हनुमंत पांडुरंग वाबळे, तालुका समन्वयक वाल्हेचे समीर मनोहर भुजबळ, कार्यकारणी सदस्य ओंकर प्रकाश फाळके, छायताई नानगुडे, सुजाता नंदकुमार गुरव, सुरज रफिक आतार, मंगेश गायकवाड, अक्षय श्रीरंग कोलते, गिरीश नारायण झगडे यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी मर्गदर्शन केले. जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य डॉ. मोहन वाघ यांनी पोस्ट कोव्हीड व कोरोनाचा नवीन आलेल्या स्टेंट बद्दल महीती देत, हिम्युनीटी कशी वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. पत्रकारांनी सकस आहार, झोपेच्या वेळा व व्यामय हे नियम काटक्षाने पाळावेत हे सांगितले. यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, समनवयक सुनील जगताप, परिषद सदस्य एम.जी. शेलार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केले, सुत्रसंचलन पत्रकार हल्ला विरोधी क्रुती समितीचे बी.एम.काळे यांनी केले, तर आभार शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांसह पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्यांनी कष्ट घेतले.
आज गुरुपौर्णिमेच्या निम्मिताने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक सुरु करण्यात आली. याच बैठकीत राज्यभरातील पत्रकारांचे श्रद्धास्थान असलेले व परिषदेचे मुख्यविश्वस्थ एस.एम देशमुख यांना गुरु मानत पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी गुरुमंत्र म्हणत देशमुख यांच्यावर पुष्पवृष्टी केली.