पुणे
पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती.या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रात यापुढे महिलेवर कुठल्याही पुरुषाने हात उचलल्यास त्याचा हात तोडून मी त्याच्याच हातात देईल असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. जळगावमध्ये महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या.
पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना पुण्यातील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ‘हा शाहु-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. या राज्यात सर्व महिलांचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे.
आता यापुढे या राज्यात कुठल्या पुरुषाने जर महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईल.त्याचा हात तोडून त्यांच्या हातात देईल, काय लावलं आहे हे? असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला. तसंच, महागाई कमी करण्याच्या नावाखाली भाजप सरकार केंद्राच्या सत्तेत आले, परंतु. गेल्या आठ वर्षात घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली आहे.
या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडले आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महागाईविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. काय घडलं होतं पुण्यात? सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम ठरलेला होता.
त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्या. यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत घोषणाबाजीला सुरुवात केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. महिलेची हातचलाखी पाहून शॉक व्हाल; दुकानात आरामात चोरी केली चोरी) या दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत तेथून बाहेर नेत होते.
मात्र, त्याच दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे. या प्रकरणात आता भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.