पुरंदर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) या पक्षाच्या वतीने ऑनलाइन रम्मी बंद करण्यासाठी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
ऑनलाइन रमी मुळे पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंब बेघर झाले आहेत यात तरुणांचे लक्षणीय सहभाग आहे यात लाखो रुपयांची कमाई या ऑनलाईन जुगारात घालवली जात आहे यामुळे अनेक कुटुंब प्रमुख आपल्या वडिलांची जमीन विकण्यास लागले आहेत व मोबाईल वरून असच टाइमपास म्हणून खेळला जाणारा खेळ आयुष्याचा सारीपाठ बिघडणारा ठरला आहे.
पालकांनी पाच लाखापासून ते 25 लाखापर्यंत देणी फेडली आहे पण घरे जमीन व शेती व सोने विकली व विकू लागले आहे तरी मुख्यमंत्री महोदयांनी विनंतीला मान ठेवून लवकरच निर्णय घेऊन ऑनलाइन रमी बंद करावी असे विनंती पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांच्या वतीने देण्यात आले आहे.
हे खरच आहे. ऑनलाइन रमी फसवा खेळ आहे याच्यावर नक्कीच बंदी आणली पाहिजे.