मुंबई
महाराष्ट्रातील बोके, खोक्यावर बसले आहेत. आता शिवसेना केवळ बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे. मुंबई महापालिका हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली, अशा शब्दात शिवसेना नेता, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.संजय राऊत यांनी त्यांच्या भांडुप निवासस्थानी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी शिंदे गट आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊत म्हणाले, ‘ मला ज्या रस्त्यावरून अटक केली. तेव्हा मी जाताना म्हटलं होतं की, मरण पत्करेन, पण शरण पत्करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या तीन महिन्यात फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण शिवसेना तोडता आली नाही.
ही अभेद्य शिवसेना आहे. ही बुलंद शिवसेना आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीने हे दाखवून दिलं आहे’.मशाल भडकलेली आहे. देशात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना राहील. आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली आहे. त्यांनी संजय राऊतांना अटक करून देशातील राजकारणातील मोठी चूक केली आहे. न्यायालयाने सांगितले की संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे.
मला कितीही वेळा अटक केली तरी, मी शिवसेना सोडणार नाही. माझ्या अटकेची आदेश दिल्लीतून आले’, असेही ते म्हणाले. ‘ महाराष्ट्रातील बोके, खोक्यावर बसले आहेत. आता शिवसेना केवळ बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे. मुंबई महापालिका हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे. सुटका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. बोलताना त्यांचा ऊर भरून आला होता, असे राऊत म्हणाले.