पुणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाकरे सरकारला मंदिर उघडा अन्यथा घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या इशाऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिले होते. घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा पण आमचा नाद करु नका, असे पेडणेकर यांनी म्हटले होते.
तसेच यावेळी बोलताना पेडणेकर म्हणल्या होत्या कि, ‘राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. मात्र भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात’, असा टोलाही किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना लगावला होता.
दरम्यान यालाच आता मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रतिउत्तर दिलेले आहे. ‘महापौर बाई , सरकार तुमचे,सरकार आहात घरात बसून आहेत त्यांना सांगताय का बिळात लपून बसले म्हणून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना,मनसे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक कठीण काळात रस्त्यावर होते आणि प्रत्येक वेळी असूच राहिला प्रश्न नाद करायचा नाही तर, आ देखे जरा किसमे है कितना दम हो. उगीच काही बरगळू नका आपल्या उंची एवढेच बोला झेपेल तेवढेच, ज्या पदावर आहे त्याचे भान राहिले तरी खूप झाले.’ असा टोला ठोंबरे यांनी किशोरी पेडणेकर यांना लगावला आहे.