मुंबई
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची तर सहप्रसिध्दी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या विशेष बैठकीमध्ये ही घोषणा केली.
मराठी पत्रकार परिषदेचे सह प्रसिद्धीप्रमुख म्हणून कुलकर्णी पूर्वी काम पाहत होते. याकाळात त्यांनी मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियामध्ये सक्रिय करण्यासाठी तसेच परिषदेची संपर्क यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
त्यांचा या कार्यांची नोंद घेत आता त्यांची राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. परिषदेतर्फे सोशल मीडियाद्वारे पत्रकार, प्रशासन आणि सरकार तसेच नागरिकांशी संपर्कात राहण्यासाठी यंत्रणा चालविण्यात येणार आहे. त्याची जबबादरीही कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तर, परिषदेचे पुणे येथील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांची सह प्रसिद्धी प्रमुखपदी नियु्क्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषद संचलीत पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य म्हणून विविध उपक्रमात ते अग्रभागी असतात. त्यांच्यातील संघटन कौशल्य ओळखून परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर यांनी निगडे यांना पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुखाची धुरा सोपवली होती.
परिषदेच्या विविध ठिकाणांच्या मेळाव्यांसह आंदोलनात त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचे विचार शहरी भागासह गावखेड्या पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे. निगडे यांच्या उल्लेखनीय कामाची पावती म्हणुन त्यांच्यावर आता सह प्रसिद्धी प्रमुख जबाबदारी टाकण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष जान्हवी पाटील, राज्यभरातील पदाधिकाऱ्यंसह पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, प्रविण शिर्के, पुरंदर तालुका अध्यक्ष योगेश कामथे, सचिव अमोल बनकर, सहसचिव मंगेश गायकवाड,बारामतीचे अध्यक्ष हेमंत गडकरी, शिरुरचे अध्यक्ष संजय बारहाते, आळंदीचे अर्जून मेदनकर, हवेलीची अध्यक्ष रमेश निकाळजे, लोणावळ्याचे अध्यक्ष संजय पाटील, श्रावणी कामत, निलेश भुजबळ, ए. टी. माने, स्वप्नील कांबळे, छाया नानगूडे, चंद्रकांत झगडे यांसह पुणे जिल्ह्यातील पत्रकारांनी निगडे यांचे यांनी कुलकर्णी व निगडे यांचे अभिनंदन केले आहे.