पुणे
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक सतत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्येच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.माझ्या वाचनामध्ये शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर अजून काही आलं नाही.
मी सध्या संपूर्ण भागात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे पाहत आहे. त्यामुळे ते काय बोलले आहेत मला माहित नाही. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.