पुणे
रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे? असे बेताल वक्तव्य भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांनी केले. विशेष म्हणजे, भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे व्यासपीठावर उपास्थित असताना आमदार भीमराव केराम यांनी हे बेताल वक्तव्य केले.
आमदार केराम यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी बोधडी येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. केराम गावात फिरकले नाही अशी ओरड होत असते. यावर बोलताना आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली आणि त्यांनी हे बेताल वक्तव्य केले.
रोजरोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का?, मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचे काम मी करतो. त्यासाठी खूप फिरावे लागते असे केराम पुढे म्हणाले.
आता या वक्तव्यावरून केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप आणि महायुती लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली मते मागत असताना केराम यांच्या वक्तव्याने मोठे वादंग उठले आहे.