पुरंदर
भारतीय जनता युवा मोर्चा,पुरंदर च्या वतीने
“हर घर तिरंगा“ अभियानाची जनजागृती व सुरुवात आज मौजे आंबळे गावातील आजी-माजी सैनिकांच्या घरी जाऊन तिरंगा देऊन व मिठाई वाटून केली यानिमित्ताने आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबाप्रति कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
याप्रसंगी वसंत ताकवले,त्र्यंबक दरेकर,शांताराम जगताप,बबन मेमाणे,बापुराव शेंडगे,गंगाराम शेंडगे,हनुमंत दरेकर व आंबळे गावचे ग्रामसेवक गोरोबा वडवले या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना तिरंगा व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विठ्ठल जगताप तसेच आंबळे गावातील युवक सहकारी अतुल दरेकर, अजिंक्य दरेकर,शरद सुतार,व्यंकटेश गायकवाड,मल्हारी थोरात,दिलीप दरेकर,उपसरपंच सचिन दरेकर,रोहीत जगताप ईतर सहकारी उपस्थित होते.