पुरंदर
जेजुरी उरुळी तसेच सासवड उरुळी या रस्त्यावर सध्या शिंदवणे घाटमाथ्यावर पुलाचे काम चालू आहे.या पुलाच्या कामामुळे रस्त्यावरील वाहतूक आंबळे मार्गे वळवण्यात आली आहे. परंतु सध्या वाघापूर चौफुला या ठिकाणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सासवड ते टेकवडी बोरी ऐंदी असा फलक लावल्याने अनेक प्रवाशांची या ठिकाणी दिशाभूल होत आहे. गेल्या दोन दिवसापासून हा फलक या ठिकाणी उभा आहे.
तरीही बांधकाम विभागाचे याकडे लक्ष गेलेलं नाही. येणारा प्रत्येक प्रवासी हा फलक पाहून पर्यायी मार्गाचा वापर न करता तो थेट त्याच रस्त्याने घाटापर्यंत पोहोचत आहे. व घाटापासून पुन्हा तो वाघापूर चौफुला या ठिकाणी परत येत आहे. अशा प्रकारची दिशाभूल झाल्याचे प्रवाशांनी संजीवनी न्यूजशी बोलताना सांगितले.
विषेश बाब म्हणजे या फलकवरील बाणाची दिशा शिंदवणे घाटमाथ्यावर जाण्याचे दर्शविते. बांधकाम विभागाने दिशादर्शक फलक लावताना नक्की आपण फलक कोणत्या दिशेला लावत आहे याची खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. परंतु हा फलक लावण्यात बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारचे गांभीर्य घेतलेले दिसत नाही.
आता अजून किती प्रवाशांची दिशाभूल झाल्यानंतर बांधकाम विभाग हा फलक योग्य ठिकाणी लावण्याची तसदी घेणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.