सासवड
बहुजन हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्धि प्रमुखपदी आंबळे गावचे माजी सरपंच मंगेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीबाबतचे नियुक्तीपत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार व थोर साहित्यिक रावसाहेब अण्णा पवार यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे.

संघटनेच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज शाहु,फुले,आंबेडकर या थोर महापुरुषांचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवुन शेवटचा माणुस केंद्रबिंदु मानुन काम करणार असल्याचे बहुजन हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध प्रमुख मंगेश गायकवाड यांनी सांगीतले.

मंगेश गायकवाड हे पुरंदर तालुक्यातीलआंबळे गावचे माजी सरपंच असुन पुरंदर तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीचे देखील सदस्य आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव कैलास भाऊ धिवार,पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष दादा डुबल ,ओबीसी सेल युवा चे अध्यक्ष आप्पा भांडवलकर,सामाजिक कार्यकर्ते भैय्या जगताप,महिला उपाध्यक्षा संजिवनी गायकवाड,पत्रकार हनुमंत वाबळे,धर्माधिकारी यावेळी उपस्थित होते