पुरंदर
बहुजन हक्क परिषदेच्या वतीने राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि स्वराज्याचे धाकलेधनी स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बामसेफ चे राष्ट्रीय प्रचारक श्रीकांत जी होवाळ यांनी पुरंदर वासीयांना महापुरुषांचे जीवनपट उलगडत असतांना त्यांनी माहीत नसलेल्या इतिहासाची माहिती देऊन पुरंदर ची भूमी कशी महान आहे याचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमात एका बालचिमुकलीने राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या इंग्रजी आणि त्याचे मराठीत भाषांतर या भाषणाने सर्व उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी बहुनज हक्क परिषद या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार म्हणाले की बहुजन महापुरुषांची विचार धाराच या देशाला वाचवू शकेल.राष्ट्रपुरुषांच्या समतेच्या विचारांचा जागर होणे गरजेचे आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम आप्पा इंगळे होते.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामथे, मराठा सेवा संघाचे,प्रशांत वांढेकर,राजाभाऊ जगताप,उद्योगपती हरिभाऊ लोळे,कैलास कामथे,मुख्यध्यापक संघाचे राष्ट्रपती पारितोषिक विजेते नंदकुमार सागर सर,कुंडलिक मेमाणे सर,प्रा.केशव काकडे सर,शिक्षक नेते राजू जगताप,संदिप जगताप,कास्ट्राईब संघटनेचे विजय वाघमारे,संजय महापुरे, पुरंदर शिक्षक पतसंस्थेचे गोरखनाथ चव्हाण,सेवानिवृत्तशिक्षक बळवंत गरुड ,सुनील कांबळे प्रा.डॉ.सुभाष नापते,बहिरवाडी चे सरपंच बापू जानकर, खानवडी चे ग्रामपंचायत सदस्य विजय होले,माजी आदर्श सरपंच रवी फुले, दत्ता होले ,नितीन होले,प्रा.शेवते सर,बहुजन हक्क परिषदेचे उपाध्यक्ष शशीभाऊ गायकवाड, सचिव संजीवनी ताई गायकवाड, कैलास धिवार,पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष डुबल,हेमलता खेडेकर,आंबळे गावचे माजी सरपंच मंगेश गायकवाड,बहुजन हक्क परिषदेचे अशोक गायकवाड,रवी भालेराव,संतोष गायकवाड, कृष्णा फुलावरे,कृष्णा भिसे,तुषार रणपिसे, तुषार लोंढे,कृष्णा भिसे,सुशील जगताप यासह सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास धिवार यांनी केले तर आभार संतोष डुबल यांनी मांनले.सर्व महापुरुषांच्या आणि महामातांच्या समतेच्या घोषणांचा जयघोष करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.