फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

मुंबई

ठाण्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इथे अनअधिकृ फेरीवाल्यावर कारवाई करण्यास गेलेल्या एका अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

सुदैवाने या घटनेत अधिकाऱ्याला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर पश्चिम बॉम्बे मार्केटजवळ रस्त्यावर बसत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करता गेलेल्या पथक अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलीये.

या फेरीवाल्याने चक्क लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाईंदर पश्चिम येथील बॉम्बे मार्केट रस्त्यावर मोठ्या संख्येने फेरीवाले बसत अससतात. त्यामुळे रविवारी संध्याकाळी फेरीवाले पथक त्या ठिकाणी दाखल झाले.

पथकाला पाहून त्या ठिकाणी उपस्थितीत फेरीवाले संतप्त झाले आणि चक्क एका फेरीवाल्याने कारवाईचा विरोध करत फेरीवाले पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केला.

यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा दल कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या संदर्भात तक्रारदार पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *