पोलिस असल्याचे भासवत जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील “या” गावात भरस्त्यात दागिणे  लुटले

पोलिस असल्याचे भासवत जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील “या” गावात भरस्त्यात दागिणे लुटले

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे पोलिस असल्याचा बनाव करून भररस्त्यात लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून  श्याम रामचंद्र सोनी वय-73 वर्ष  वार्ड नंबर 2 निरा तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी जेजूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . 

याबाबतीत जेजूरी पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार  फिर्यादी यांना  दिनांक 30/07/2022 रोजी दुपारी 03:15 वा चे सुमारास निरा गावात निरा रेल्वे स्टेशन समोर साईबा हॉटेल जवळ एक अनोळखी इसमाने मोटरसायकल वरून येऊन पोलीस असल्याचा बहाना करून ओळखपत्र दाखविले व फिर्यादी यांना म्हणाला की या ठिकाणी चोऱ्या होतात आम्ही तपासणी करीत आहोत तुम्ही तुमचे हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोन्याची चैन माझे ताब्यात द्या असे म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या  हातातील अंगठी व गळ्यातील चैन त्या इसमाचे ताब्यात दिली असता त्याने चैन व अंगठी रुमाला मध्ये ठेवून फिर्यादी यांच्याकडे दिली व तो निरा लोणंद रोडने मोटरसायकल वरून लोणंद बाजूकडे निघून गेला त्यानंतर फिर्यादी यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यात ठेवलेली  सोन्याची चैन आणि अंगठी दिसली नाही.

त्यामुळे फिर्यादी यांची खात्री झाली की अनोळखी इसम थांबून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून पोलीस असल्याचे खोटे सांगून  70,000/- रु कि ची अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन,15000/- रु कीमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी  असा एकूण 85,000/- रुपयेचे दागिने लंपास केले आहेत जेजुरी पोलिसांनी  भा.द.वि. कलम 341,420,406,170 अन्यवे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *