आमदार राहुल कुल यांना निवेदन सादर.
पुरंदर माळशिरस
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टोकाचे गाव असलेल्या पोंढे येथून दौंड तालुक्यातील यवत येथे जाणाऱ्या जुन्या घाटरस्त्याचे काम झाल्यास पोंढे गावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. या रस्त्याचे काम होण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घेतला आहे.रस्त्याचा अधिक भाग दौंड तालुक्यात येत असल्याने आमदार राहुल कुल यांना निवेदनसादर केले.
निवेदनात म्हटले आहे की
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टोकाचे गाव असलेल्या पोंढे येथील ग्रामस्थांना नोकरी,व्यवसाय, बाजारपेठ व इतर सर्वच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी यवत (ता, दौंड) या ठिकाणी रोजच जावे लागते.या ठिकाणी येण्यासाठी पोंढेतील ग्रामस्थांना माळशिरस भुलेश्वर घाट ते यवत असा वीस किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. मात्र पोंढे गावातून यवत या ठिकाणी जाण्यासाठी पोंढे ते डायरेक्ट यवत असा जुना घाट रस्ता आहे.
या रस्त्याचे अंतर केवळ सात किलोमीटर आहे.महत्वाचे म्हणजे या सात किलोमीटर अंतरा पैकी यवत पासून ते घाटाच्या पायथ्यापर्यंत असणारा चार किलोमीटर रस्ता पक्क्या स्वरूपाचा (डांबरी) आहे.तसेच आमच्या पोंढे गावापासून घाटाच्यामाथ्या पर्यंतचा दोन किलोमीटर रस्ताही पक्क्या स्वरूपाचा आहे.
केवळ घाटातील एक किलोमीटर रस्ता दुरावस्थेतआहे.त्याचे कारण म्हणजे हा एक किलोमीटर रस्ता फॉरेस्ट खात्या अंतर्गत येतो. या फॉरेस्ट खात्या अंतर्गत येणारा रस्ताचांगला नसल्याने आम्हा पोंढे ग्रामस्थांना वीस किलोमीटर चा लांबचा प्रवास करावा लागत आहे.या फॉरेस्ट खात्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम झाल्यास पोंढे गावचा सर्वांगीण विकास होईल व युवकांचे भविष्य सुधारेल असे निवेदनात म्हटले आहे..
यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष राजेंद्र वाघले, अमोल वाघले, मनोहर वाघले, युवराज वाघले, आकाश वाघले, पत्रकारहनुमंत वाघले आदी उपस्थित होते.