पुरंदर
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र पोंढे येथे स्तनपान सप्ताह व अन्न प्राशन दिनानिमित्त महिलांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
डीलेवरी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत मुलांना मातेचे दूध पाजावे.हे बाळासाठी पहिली लस आहे.त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते.बाळ सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला वरचा पूरक आहार द्यायला सुरुवात करावी.अशा प्रकारे मातांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच नंदा वाघले,अशा वर्कर शुभांगी वाघले,अंगणवाडी सेविका छाया नलगे,मदतनीस ललिता वाघले,मनीषा वाघले,अश्विनी लोखंडे,कल्याणी लोखंडे,नीलम वाघले,छाया वाघले,सोनाली वाघले,शीतल लोखंडे आदी उपस्थित होते.