पॉलिग्राफ चाचणीत आफताबचं खळबळजनक विधान !!!!                     “फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा मिळतील”

पॉलिग्राफ चाचणीत आफताबचं खळबळजनक विधान !!!! “फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा मिळतील”

मुंबई

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं सर्वांनाच हादवून सोडलं आहे. आरोपी आफताबने त्याची प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. पोलीस चौकशीत त्याने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. आफताबला शिक्षा होण्यासाठी पोलीस सबळ पुरावे शोधत आहेत. दरम्यान, नुकतीच आफताबची पॉलिग्राफ चाचणी पार पडली.

या चाचणीत त्याने दिलेल्या जबाबामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.आरोपी आफताबने पॉलिग्राफ चाचणीत केलेली काही विधानं ही थक्क करणारी आहे. श्रद्धा हत्या प्रकरणात मला फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा मिळतील, असं धक्कादायक विधान आरोपी आफताबने केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आफताफच्या या विधानामुळे तो कट्टर मानसिकतेचा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब हा डेटिंग अँपवरून हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा.

इतकंच नाही तर त्याने श्रद्धासोबतच्या नात्यादरम्यान, २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते, असा जबाब पोलिसांना दिल्याची माहिती आहे.आरोपी आफताब हा हिंदू मुलींना बंबल अँपवर शोधून आपल्या जाळ्यात अडकवायचा. श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर तो एका मानसशास्त्रज्ञाला आपल्या रूममध्ये घेऊन आला होता. ती तरुणी देखील हिंदूच होती. यावेळी त्याने श्रद्धाची अंगठी भेट देऊन तिला आपल्या जाळ्यात अडकवले, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *