सासवड
पवारवाडी (ता. पुरंदर) या ठिकाणी स्मशानभूमी जवळ ओढ्याच्या ठिकाणी नवजात मृत पुरुष असलेले अर्भक सापडल्याने या दिवे पंचक्रोशीत एकच खळबळ ऐन दिवाळीच्या स्थितीत घडली. याबाबत माहिती मिळता क्षणी सासवड पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर स्थानिकांच्या मदतीने ते अर्भक ताब्यात घेतले.
याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार संतोष शिंदे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेतली. पुणे ते पंढरपूर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील पवारवाडी स्मशानभूमी जवळील ओढ्याच्या या ठिकाणी पाण्यात एक नवजात अभॅक दिसल्याची माहिती प्रत्यक्ष झेंडेवाडी चे पोलीस पाटील विकास झेंडे यांनी सासवड पोलीस स्टेशनला फोन द्वारे माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आदित्य भोसले यांच्या मदतीने पाण्यातून ते अभॅक बाहेर काढले .पंचनामा केल्यानंतर ते अभॅक ताब्यात घेतले.
अज्ञात इसमाने ते अभॅक ओढ्याच्या पाण्यामध्ये टाकला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.