पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वीर राऊतवाडी येथील शेतकऱ्यांची वीर धरण प्रकल्पग्रस्त मध्ये वीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यानेआज तब्बल 28/2/1986 साली जलसंपदा विभागाने संपादित केलेल्या जमिनी मध्ये जनावरांचे गोठे ,विहीर ,फळझाडे, कोणत्याच प्रकारची नुकसानभरपाईआज अखेर जलसंपदा विभागाकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नसून त्यांचीफसवणूक झाली आहे गेलेल्या जमिनींचा मोबदला आज अखेर शासनाच्या भोंगळ कारभारामुळे मिळालेला नाहीन्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या वीर राऊत वाडी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार पुरंदर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचाइशारा देण्यात आला होता यावेळी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्यासुरेखा ढवळे यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वीकार करून चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गीलावा अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याची दखल घेत काल अखेर माननीय तहसीलदाररूपाली सरनोबत नायब तहसीलदार बडे रावसाहेब त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा करून वीरयेथील एका गाव गुंडानेवीर धरण प्रकल्पग्रस्तात आपली इंचभरही जमीन गेली नसतानाही काही शेतकऱ्यांना दमदाटी करून जमीन हडपकरण्याच्या दृष्ट हेतू ने2008 सालापासून गरीब शेतकरी यांना हाकलून तुमच्या नावाचे सातबारे दाखवा असे मन गट शाहीकरून जमिनी बळकावल्या होत्या त्याच अनुषंगाने काल तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्यासमोर कागदपत्राच्या पाठपुराव्यानुसार व गाव गुंड यांच्याकडे कुठलेही पुरावे नसल्याच्या कारणानेअखेर गाव गुंडाला जमीन सोडून हद्दपार होण्याचीतबी तहसीलदार कडून देण्यात आली जमिन खाली करून न दिल्यास कारवाई करून गुन्हा दाखल करू तसेच वीर राऊतवाडी प्रकल्पग्रस्तांना बदलल्यास शासनाच्या जमिनी देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन शाखा यांनी 1/6/1996 रोजी आदेश दिला असतानाही आज अखेर पंचवीस वर्षे उलटूनही वीर प्रकल्पग्रस्त शेतकरी मात्र न्यायाच्या प्रतीक्षेतआहेत आज अखेर गटवारी होऊन शासनाने दिलेले क्षेत्र वाटप करून नबंर व हदद दाखवण्यात आली परंतु अद्यापहीत्यांच्या नावे सातबारा तयार झालेला नाही तसेच मोजणी करूनही मोजणी ऑफिस कडे कप्रत उपलब्ध नाही ही अत्यंतखेदजनक बाब आहे तसेच जमिनीचा सातबारा उतारा तयार केल्या नसल्याने अद्याप 25 वर्ष शेतकऱ्यांना मात्र उपोषणकरून न्यायाच्या प्रतीक्षेत बसावे लागले आहे यांची दखल घेऊन सुंदर हवेलीचे विद्यमान आमदार माननीय संजय जगतापसर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पुनर्वसन शेत्रातील अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितलेव स्वतः वीर व राऊतवाडी येथील शेतकऱ्यांना आपल्या स्वीय सहाय्यक यांच्याबरोबर पुनर्वसन पुणे येथील पुनर्वसन शेत्रकार्यालयात जाण्यासाठी सांगून दोनच दिवसात काम मार्गी लावण्याचे शब्द त्यांनी दिला त्यानंतर उपोषण मागे घेण्यातआले यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सुरेखा ढवळे महेश राऊत, सुजित राऊत, प्रवीण नवले, संकेत राऊतअमोल राऊत ,अजय नवले, सुरेश राऊत, केशव नवले, अकेत राऊत, लता राऊत,लता राऊत ,कल्पना नवले अंजना राऊत,मनिषा नवले, रामदास राऊत ,केशव नवले ,सुरेश राऊत आधी प्रकल्प ग्रस्त शेतकरी बहुसंख्येने हजर होते