पुरंदर
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील वृद्धाश्रमात माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरंदर तालुका शिवसेनेच्या वतीने फळे ,भाजीपाला,बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
आंबोडी येथील माया केअर वृद्धाश्रमाचे संचालक डॉ भाटे ह्या दाम्पत्य करीत असलेली वृद्धांची सेवा पाहून खूप आनंद झाला आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात वृद्धांना आधाराची गरज असते ती पुर्ण करण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांचे यापुढील वाढदिवस आंबोडी येथील वृद्धांसोबतच साजरे केले जातील तसेच या वृद्धाश्रमासाठी लागणारी सर्व मदत करण्याची तयारी शिवम बिल्डसचे मालक ॲड.नितिन कुंजीर व सर्व कार्यकर्त्यांनी दाखवली.
यावेळी शिवसेना नेते मनोज कुंजीर,वाघापुरचे माजी उपसरपंच प्रविण कुंजीर ,पाणलोट समिती अध्यक्ष रामदास कुंजीर,सुरज कुंजीर,अनिकेत कुंजीर,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे ,शिवसेना अध्यक्ष विक्रांत पवार,संतोष खेडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.