पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झाला असून कॉँग्रेसने दोन जागांवरविजय मिळवला आहे.तर राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस प्रणित तिसऱ्या आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले आहेत.
तर पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांच्या पत्नी जयश्री शिंदे यांचा पाच मताने पराभव झाला आहे.
पुरंदर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या व प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेला विशेष यश मिळवता आले नाही.
मात्र सेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नाराज गटातील लोकांनी एकत्रित येत बनवलेल्या विकास आघाडीच्या पॅनलने पाच जागांवर विजय मिळून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादीचे निलेश शिंदे,शिवसेनेचे प्रकाश शिंदे,काँग्रेसचे रुपेश यादव यांनी एकत्र येत बनवलेल्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
आघाडीने सात पैकी सहा जागांवर उमेदवार उभे केले होते.शिव सेनेच्या शुषमा भोसले यांनी निवडणूक काळात सेनेशी फारकत घेत आघाडीशी हात मिळवणी केली होती.त्यामूळे त्यांचाही विजय झाला आहे.
तर आघाडीतील जयश्री शिंदे यांना पाच मताने पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे संतोष यादव यांना सुधा तीन मताने पराभवाचा सामना करावा लागला.तर काँग्रेसचे नीरा कोलविहिरे गटाचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांना ७३ मताच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे .