पुरंदर मधील “या” गावात वाहते रस्त्यावरुन पाणी !!!!! चारच दिवसात पाणीपुरवठा करणार्या टाकीतुन दोनदा पाणी रस्त्यावर

पुरंदर मधील “या” गावात वाहते रस्त्यावरुन पाणी !!!!! चारच दिवसात पाणीपुरवठा करणार्या टाकीतुन दोनदा पाणी रस्त्यावर

पुरंदर

पाणी म्हणजे जीवन ! पाण्याचा काटकसरीने वापर करा हे फक्त घोषणेपुरतेच व कागदावर लिहिण्यापुरते राहिल्यासारखे दिसत आहे याची प्रचिती येते ती पुरंदरमधील आंबळे ग्रामपंचायतकडुन.

आंबळे गावात नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सुमारे सव्वालाख लिटरची टाकी आहे. परंतु एकाच आठवड्यात दोन वेळा पाणी पुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीमधुन रस्त्यावर पाणी आल्याची घटना घडली आहे.

गावाला पिण्यासाठी पाणी नसते पण रस्त्यावर सोडायला पाणी असते अशा प्रकारची स्थिती असल्याचे दिसत आहे.

आठवड्यातला बुधवार हा दिवस गावात कोरडा दिवस पाळला जातो. परंतु बुधवारीच टाकी भरुन वाहिली होती त्यावेळी ग्रामपंचायतशी संपर्क साधला असता परत असे होणार नाही असे ग्रामपंचायतीने सांगीतले होते.

ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सदर ठिकाणी पाईप टाकुन पाणी काढुन देण्याची व्यवस्था करण्यात येईल. : राजश्री थोरात,सरपंच,आंबळे.

परंतु आजही ही टाकी ओव्हरफ्लो होऊन पुर्ण रस्त्यावर पाणी साचुन रस्त्याला डबक्याचे स्वरुप आलेले दिसत आहे.हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न गावकर्यांना पडला आहे.

सदरचा रस्ता हा कच्चा असुन या रस्त्यावरुन शेजारीच असणार्या शेतकर्यांची उसवाहतुक होत आहे. सदर रस्ता हा पाण्यात गेल्याने या रस्त्यावरुन उस वाहतुक कशी करावी असा प्रश्न येथील उस उत्पादक शेतकर्यांनी विचारला आहे.

या सगळ्या झालेल्या प्रकारावर ग्रामपंचायत काय निर्णय घेणार? याकडे पुर्ण गावचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *